लातूर :-गांधी चौक पोलिसांच्या पथकाने काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गुळ मार्केट ते महात्मा गांधी चौक दरम्यानच्या रस्त्यावर अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने विदेशी दारू घेवू जात असताना विदेशी दारूसह कार जप्त केली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पोलिसांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.