आज दि. 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास नांदेड जिल्हाधिकारी यांना धर्माबाद तालुका शेतकरी बांधवांच्या वतीने रोशनगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीची निगडित विविध मागण्याचे निवेदन दिले असून ज्यात तालुक्यासह जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, पिक कर्ज माफ करावे, तालुक्यातील नदी काठच्या शेतकऱ्यांसाठी विशेष अर्थ साहाय्य देण्यात यावे यांसह इतरही अनेक शेतीशी निगडित बाबींचा निवेदनात उल्लेख आहे.