मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाणे हद्दीतील मौजा पांढराबोडी येथे दि. 27 ऑगस्ट रोज बुधवारला सकाळी 7 वा.च्या सुमारास वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस नायक अंकोश पुराम यांनी पेट्रोलिंग दरम्यान रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यावेळी सदर ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा एकूण 7 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी ट्रॅक्टर चालक महेश गजानन शहारे रा. दाभा याच्याविरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.