राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेशाची मूर्ती स्थापून गणेशोत्सवाची सुरुवात केली..पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंग आणि भजनांच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली..यानंतर विधिवत पूजाअर्चा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी आमदार मिटकरी यांनी प्रार्थना करताना देशभरातील शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं अशी मागणी श्रींच्या चरणी केली. तसेच वराह जयंती साजरी करणाऱ्यांना श्री गणेश सद्बुद्धी देवो, असेही ते म्हणाले.