पुलाची शिरोली येथील गाव तलावात उडी मारून परप्रांतीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. जोगिंदर राय (वय ३६ सध्या रा.माळवाडी शिरोली,मूळ बिहार) युवकाचे नाव आहे. सदर घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जोगिंदर राय हा युवक शिरोली औद्योगिक वसाहत येथे कामास होता. वसाहतीला सोमवार पासून सुट्टी असते.त्यामुळे तो कुठेतरी गेला असेल म्हणून कुटुंबियांनी दुर्लक्ष केले.