पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील ७७ वर्षीय महिलेची तब्बल ३२ लाख ६ हजार ४४७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादींना फोन करून आपण ईडी (अंमलबजावणी संचालनालय) मधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादींच्या नावाने कंपनी रजिस्टर असून, त्यांचे आयडेंटिटी थेफ्ट झाले आहे. तसेच त्यांच्या नावाने बँक खाते उघडून त्याद्वारे मनी लाँड्रींग सुरू असल्याचे सांगून