गेल्या महिन्यात हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर "हरित बीड अभियान" पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आले. एका दिवसात तब्बल ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आली आणि त्याची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. परंतु, याच हरित अभियानाला तडा देत गणेश विसर्जनाच्या दिवशी बीड जिल्हा कारागृह आवारातील लिंब, चिंच, कवठ, शेवरी, वड यांसारखी ४०-५० वर्षे जुनी असलेली ५० हून अधिक झाडे बुंध्यापासून कापून टाकण्यात आली. त्यामुळे जेलरवरच कारवाईसाठी कारागृहासमोर आंदोलन केले