बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये अचानक आग लागल्याची घटना रात्री उशिराच्या सुमारास घडली होती. अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला आणि पोलीस स्टेशनमध्ये आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु अचानक पोलीस स्टेशनमध्ये आग लागल्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती.