लातूर- मनपाचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी लातूर शहरात धडक मोहीम सुरू केलेली असून मनपा आयुक्त यांच्या आदेशावरून तसेच उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गंजगोलाई परिसरात व लातूर शहरातील औसा रोडवरील प्रभाग क्रमांक 15 व 17 आणि जॉन ए मध्ये आज सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिंगल युज प्लास्टिक विरोधात मोहिम राबविण्यात आली.