तहसीलदार माळशिरस यांच्या आदेशानुसार मौजे मोटेवाडी (फोंडशिरस) येथे जमीन गट नं. 429 मधून जाणाऱ्या 10 फुटी रस्त्याचे काम सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू करण्यात येत असताना शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला. मंडल अधिकारी धवल काशिनाथ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी अर्षद नौशाद सैय्यद, कोतवाल महादेव खवळे तसेच पोलीस बंदोबस्तासह अधिकाऱ्यांनी ठिकाणी दाखल होऊन रस्ता कामाला सुरुवात केली.