करमाळा तालुक्यात दुपारी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. वरकुटे येथील नारायण प्रभाकर जगताप यांच्या मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली तब्बल ₹2 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. जगताप हे भाऊ जयराम जगताप यांच्या घेतलेल्या पीक कर्जासाठी रक्कम जमा करण्याकरिता करमाळा येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये गेले होते. बँकेत प्रक्रिया उशीराने होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी डिकीत रक्कम ठेवून किराणा दुकानाजवळ मोटारसायकल पार्क केली. काही मिनिटांतच रक्कम गायब झाल्याचे दिसले.