वरोरा तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत ही वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असते. यातच मागील महिनाभरापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे गावातील महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. संतप्त महिलांनी आज दि 29 मे ला 10 वाजता ग्रामपंचायतला घेराव घालून शेगाव सरपंच यांना विविध प्रश्न केले परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.