राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात भंडारा तालुक्यातील नवेगाव कोका, इंजेवाडा येथील अंकोश मेश्राम, रमेश झोडे, प्रीती पुसाम,खोब्रागडे ताई मीना ताई, बबन मेश्राम, संदीप कुंभारे व इतर महिला पुरुष कार्यकर्ते यांनी आज दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान श्रीगणेश चतुर्थी पावन परवावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ता हजर होते.