गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून मुंबई–पुणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढू लागला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही मुंबई–गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसत आहे. आज सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशभक्त आपल्या गाड्यांवर सामान बांधून, गणपती बाप्पाच्या मूर्तींसह कोकणाकडे निघाल्याचं चित्र समोर आलं आहे. महामार्गावरील बहुतांश मार्ग फुल्ल झाले असून, वाहनांची लांबलचक रांग लागल्याने काही ठिकाणी प्रवासाचा वेग कासवगतीने सुरू आहे.