बीड शहरातील तेलगाव नाका येथे भीषण अपघात घडलाबीड शहरातील तेलगाव नाका परिसरात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 20 44 एफ 3623 आणि एमएच 23 बीएफ 4171 या दोन मोटरसायकल एकमेकांवर जोरदार धडकल्या. या धडकेत एका युवकाची प्रकृती गंभीर जखमी झाली असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बीड पोलिस दाखल झाले होते.