काटेबाम्हणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील तिघेजण जखमी झाल्याची घटना दि. 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला रात्री 9 वा.च्या सुमारास घडली. गणेश बिसने व त्यांची पत्नी अचला बिसने तसेच त्यांच्या नातेवाईकांची मुलगी सीरिया चौधरी सर्व रा. उसर्रा हे मोटरसायकलने तुमसरकडून उसर्रा कडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने मोटरसायकलला धडक देऊन पसार झाला. या धडकेत मोटरसायकल वरील तिघेजण जखमी झाले असून पसार झालेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.