स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना आज दि २६ आगस्ट ला १२ वाजता त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, तीन युवक त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल सह सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहेत. यावरुन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी जावुन सदर युवकांची चौकशी केली असता तिघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.