तेल्हारा तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरुणाने वडिलांशी झालेल्या किरकोळ वादानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. तेल्हारा-घोडेगाव महामार्गालगत मंगेश घोंगे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम घोंगे व सहकारी राजू तायडे, शुभम वाकोडे, संतोष निकाडे, जय बोदळे यांनी धाडस दाखवत दोर कापून तरुणाला खाली उतरवले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.