कोरोची येथील अष्टविनायक कॉलनीमध्ये भर दिवसा घरात कोणी नसल्याचे पाहून सुमारे पावणे पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना शहापूर पोलिसांनी केवळ १२ तासांत अटक केली.बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आरोपींकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता शहापूर पोलिसातून मिळाली.