पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पूर्वतयारी उपक्रमाचा शुभारंभ पार पडला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. आमचे आमदारांचेही अभ्यास दौरे होत असतात त्यामध्ये किती जण अभ्यास करतात हा विषय वेगळा आहे अशी मिश्किल टिपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.