नॅशनल रुरल हेल्थ मिशन च्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १० ते १२ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भ आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील,विशेषतः इंटेरियर एरियातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे आणि शेतकरी चळवळीतील खंदे कार्यकर्ते कॉम्रेड सचिन मनवर यांनी यवतमाळ तालुक्यातील सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.