मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी झाले आहेत. त्यातील काही मराठा आंदोलन नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. वास्तव्यास असलेल्या आंदोलकांनी पोलिसांनी केलेली विनंती जुगारून थेट वाशी येथील रेल्वे रूळ ओलांडले. पोलिसांनी त्यांना रेल्वे रोड न ओलांडल्याचे आव्हान केल्यानंतर पोलिसांसोबत हुज्जत घातली. हा सर्व प्रकार एका मोबाईल कॅमेरा चित्रीत झाला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे