आज पहाटे (२८ ऑगस्ट) चार-पाच वाजता खराडी रस्त्यावर महालक्ष्मी लॉन्स समोर एका पञ्याचे शेडमध्ये असणारे चारचाकी वाहनांसाठी लागणारे साहित्य तसेच यंत्रसामुग्री, प्लास्टिक, कागद, पुठे इत्यादी सामानास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या तीन वाहंनासह जवानांनी आग आटोक्यात आणत धोका टाळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.