साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे वार्तांकन करत असताना, त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण करणे धक्कादायक आणि निंदनीय आहे. फडणवीस यांच्या गृहखात्यातील पोलिसांकडून पत्रकारांवर सुरु असलेल्या दादागिरीचा आणि मारहाणीचा निषेध करतो.