आज दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 च्या वेळेत किनवट शहरातील कलावती गार्डनपासून निघत उपविभागीय कार्यालयावर" हामा आरक्षण हामनेच देणो" असे हातात फलक घेत बंधारा समाजाचा विराट मोर्चा निघाला होता, उपविभागीय कार्यालय येथे निवेदन दिल्यावर विराट मोर्चाचे रूपांतर दुपारी 3 वाजता सभेत झाले होते, हैद्राबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ह्या एकमुखी मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी हजारोच्या संख्येने बंजारा समाज बांधव व भगिनी सहभागी झाले होते.