महाड तालुक्यातील बिरवाडी येथे ४२ वर्षीय दुकानदाराने आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवार, दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संतोष तानाजी जाधव (वय ४२, रा. खरवली, ता. महाड) असे आत्महत्या केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. बिरवाडी बाजारपेठेत त्यांचे श्री कृपा नावाचे भांड्यांचे दुकान असून याच दुकानात त्यांनी गळफास घेतला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कार