आज शनिवार दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यसभेचे खासदार डॉ.अजीत गोपछडे यांनी मुखेड तालुक्यात ढगसदृष्य पावसामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्तांच्या गावी भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान खासदार गोपछडे हे हसनाळ येथील पुरग्रस्तांची पाहणी केली असता आज रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान हसनाळ येथे प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की. हसनाळ येथील पुरग्रस्तांच्या संसार उपयोगी साहित्यासाठी खासदार निधीतून २० लाखांची मदत व राष्ट्रीय आपत्तीच्या माध्यमातून विशेष पॅकेजसाठी प्रयत्न करणार असे म्हटले.