डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवी मादणी येथे ३ सप्टेंबर च्या रात्री चोरट्यांनी एका घरातून ९२ ग्राम सोने, १६० ग्राम चांदी असा ५५ हजार रुपयांचा एवज लंपास केला. या प्रकरणी शिवाजी शेषराव मेटांगळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील दरवाज्याचे नट व स्कू कढी तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने कपाट उघडून लंपास केले.