हवामान विभागाने धुळे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस 'येलो अलर्ट' जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः धुळे आणि साक्री तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन असून, नंदुरबार, जळगाव व नाशिकमध्येही पावसाचा अंदाज आहे.