नागपंचमी निमित्त पारस ग्रामपंचायत मध्ये मंगळवार दि.२९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वऱ्हाडी 'ठावा' रंगला होता.विदर्भात सापावर अर्थात नागावर चक्क स्वतंत्र भजनांचीच परंपरा आहे.हा वऱ्हाडी गीतप्रकार असून 'ठावा' या नावाने ओळखला जातो.आजही विदर्भात सापावर अर्थात नागावर चक्क स्वतंत्र भजनांचीच परंपरा आहे.'ठावा' नावाने ओळखला जाणारा हा गीतप्रकार विदर्भातील अनेक गावांमध्ये आजही परंपरेनुसार सुरू असून नागाच्या गाण्यावर ठाव्याचा ठेक्यात रंगुन जाणाऱ्या मंडळीसाठी नागपंचमी ही पर्वणीच ठरते.