बीड तालुक्यातील रत्नागिरी गावात आज सकाळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात वांगी शिवनी आणि भवानवाडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याने आता रत्नागिरी गावात कारवडीचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. स्थानिक शेतकरी राधेश्याम घल्लाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पाळीव कारवडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिचा जीव घेतला. याचबरोबर त्यांचे पाळीव कुत्रे देखील बिबट्याने जंगलात ओढत नेऊन ठार केले. एवढेच नव्हे, तर परिसरातील शेळ्यांवरही हल्ला करण्यात आले.