पूर्णा शहराच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन 10 वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले. विश्वदीप कांबळे (वय 10)वर्ष रा. नालंदा नगर पूर्णा असं त्या मयत बालकांचे नांव आहे. घरुन बाहेर गेलेला विश्वदीप परत न आल्यामुळे नातेवाईकांनी पोलीसांना कळवले. विश्वदीपचा शोध घेणा-या पोलीसांना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हरिनगर येथे पालीकेकडुन पाण्याच्या टाकी बांधकामा साठी खोदलेल्या खड