वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील शेतकऱ्याच्या काबाडकष्टाच्या पैशावर डल्ला टाकत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तात्काळ अटक करत तब्बल १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने केली आहे.