भिवापुरात भरदाव कारचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघातीत इतका भीषण होता की भरधाव कार थेट मरू नदीच्या पुलावरून 35 ते 40 फूट नदीपात्रात कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 24 ऑगस्टला सकाळी आठ वाजताच्या सुमारास निलज कडून उमरेडला जाताना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीने नदी पात्रातून कार बाहेर काढण्यात आली आहे