गत अनेक दिवसापासून सातपूर परिसरात छत्रपती शिवाजी नगर भागात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ऊर्जा युवा फाऊंडेशनच्या मार्फत नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर वनअधिकारी यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांचे समवेत पाहणी करून तात्काळ पिंजरा लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.