सेनगांव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरावे अन्यथा जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन शाळा भरविण्यात असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिला आहे. अनेक वेळा शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली मात्र दखल न घेतल्याने आंदोलनाचा इशारा दिला.