संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा 23 व 24 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या एकूण 9 परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, 5 हजार 30 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.परीक्षाथ्र्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रासह आधार कार्ड, मतदान कार्ड आदी ओळखीचे पुरावे परीक्षेच्या वेळी आणणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ संत गाडगे बाबा अमरावती डॉ.नितीन कोळी यांनी केले आहे.