पुणे – वारजे येथील लंबोदर आर्टस् गणेशमूर्ती स्टॉलमध्ये तीन अनोळखी इसमांनी तब्बल दोन लाखांची रोकड लंपास केली. दुपारी साडेचार वाजता हॉटेल चिलापी शेजारी असलेल्या स्टॉलमध्ये फिर्यादी यांची पर्स रॅकमध्ये ठेवली होती. त्या पर्समधील २,००,००० रुपये चोरांनी चोरून नेले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार वारजे माळवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.