आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भव्य रूट मार्च दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता काढण्यात आला. हा मार्च जुने शहर परिसरातून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गांवरून परिक्रमा करत सिटी कोतवाली येथे समापन झाला. रूट मार्चदरम्यान पोलीस दलाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश दिला.