आपला देश कृषीप्रधान आहे. ग्रामीण भागातील 90 टक्के अर्थव्यवस्था आजही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना शेती करतांना अनेक टप्प्यांवर अडचणी येत आहे. अनेक वेळा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. शासनसुध्दा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रत्येक टप्प्यांवर मदत करित आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या स्व. सिंधुताई सपकाळ सभागृहामध्ये दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने आयोजित पीक कर्ज मेळाव्याच्या उद्घाट