राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असतांना पोलीस यंत्रणेसह इतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मराठा आंदोलनाचे अपडेट मिळविण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करीत असतांना जालन्याच्या पोलीसांना मराठा आंदोलकांनी चकवा देत थेट मुंबई गाठली आहे.पोलीसांनी दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त मराठा आंदोलक हे मुंबईकडे रवाना झाले असून अजुनही मराठा आंदोलन जेवणार्या साहित्यासह मुंबईकडे रवाना होत आहेत.अशी माहिती मराठा आंदोलक तथा रामनगरचे सरपंच अॅड.गोपाल मोरे यांनी गुरुवार दि.28 ऑगस्ट 2025 रोजी दु. 4.30 वा. दिली.