आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी 11 वाजता जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात 98.73 टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे 18 दरवाज्यातून अर्धा फुटाणे विसर्ग आतापर्यंत सुरू होता तो आता अजून अर्धा फुटाणे वाढून 1 फुटावर सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू राहणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आला