पिकप वाहन चालकाला अडवून जबरदस्तीने लूटमार करणाऱ्या फरार आरोपीला पाच महिन्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भद्रकाली भागातील गुमशा बाबा दर्गा,नानावली येथे ताब्यात घेतले आहे.नानावली येथील गुमशा बाबा दर्गा, अमरधाम रोड येथे एका पिकप वाहन चालकाला अडवून चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली, तसेच खिशातील रोकड चोरी करून नेली होती.भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आवेश आतिक खान याला गुमशा बाबा चौक येथे अटक केली आहे.