दि.27 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट च्या 12 ते 2:30 वाजेच्या दरम्यान मोहगाव बुज शेत शिवारात फिर्यादी जवाहरलाल बोपचे यांची शेती असून त्यांच्या शेतीला लागून पांगोली नदी आहे. त्या नदीमध्ये शेतीला पाणी देण्याकरिता क्रॉम्प्टन कंपनीची पानबुडी मोटरपंप किंमत अंदाजे 15 हजार रुपयाची लावली होती. सदर मोटर पंप कोणीतरी अज्ञात चोराने चोरी करून नेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.