ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी २१ आॅगस्ट रोजी रंगेहात पकडले आहे.महेश जरीचंद चौधरी व आमसिद्ध इराण्णा बगले अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.दोघांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.