मुख्यमंत्री व कोट्यावधी बहिणींचे लाडके बंधू देवाभाऊंना सोलापुर ग्रामीण जिल्हातून १५ मंडलातून तब्बल ३४ हजार ७१० बहिणींनी राखी भेट दिली. या सर्व राख्यांचे संकलन करून या राख्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्या. त्यांच्या काळात महिला विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे. महिला सुरक्षा, आर्थिक विकास व सक्षमीकरणासाठी सरकारकडून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहेत. त्यामुळे कोट्यावधी बहिणींचे प्रेम व आशीर्वाद देवाभाऊंवर असल्याचं ते म्हणाले आहेत.