धुळे शहरातील प्रभाग क्र. २ मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झाला. ओसवाल नगर-विद्यानगर वीज मंडळ कार्यालय, नगावबारी अष्टकोणी कोटा-मारुती मंदिर, सदाशिव नगर व ग.द. माळी सोसायटीतील कामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. सुभाष भामरे, गजेंद्र अंपळकर, कल्पेश थोरात यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दयनीय रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित विकासकामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार अग्रवाल यांनी दिले.