मालेगाव गिरणा धरण भरले 96 टक्के.. आज धरणाचा एक दरवाजा उघडून त्यातून 814 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु.. ANC: आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मालेगाव भागात असलेले गिरणा धरण 96 टक्के भरले असून धरणातील पाण्याच्या पातळीत झापाट्याने वाढ होत असल्यामुळे आज धरणाचा एक दरवाजा उघडून त्यातून 814 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या धरणातून मालेगाव, नांदगावंसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव यांसह इतर गावांना पाणी पुरवठा केला जातो.