शेती आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याचं एक उत्तम उदाहरण आज वर्ध्यात पाहायला मिळालं. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बजाज कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी धानोरा गावात "सहभागी ग्रामीण मूल्यमापन व कृषी प्रदर्शनी" या कार्यक्रमाचं आयोजन केलं. असल्याचे आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आल्याचे सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे