मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उद्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील भव्य असे आंदोलन करणार आहेत. त्यांच्या हाकेला लाखो मराठा बांधवांनी प्रतिसाद दिला असून मुंबईकडे रवाना झाले आहेत. येणाऱ्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नवी मुंबई एपीएमसी येथे मराठा आंदोलकांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.